लवकरच २० रुपयाची नवी नोट चलनात

unnamed

नवी दिल्ली (वृत्तसेवा)   रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) लवकरच २० रुपयाची नवी नोट चलनात आणणार आहे. यामुळे चलनात असलेल्या २० रुपयांच्या जुन्या नोटांना कोणताही धोका नाही. आता नव्या नोटेसोबत जुन्या नोटाही पूर्ववतपणे चलनात राहतील, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे.

 

अशी असेल नवीन नोट 

२० रुपयाच्या नव्या नोटेचा रंग हा हिरव्या आणि पिळव्या रंगाच्या मिश्रणातील रंग (हिरवट पिवळा) असेल.  या नोटेची साईज ६३mm बाय १२९ mm अशी आहे. या नोटेच्या मागील बाजूस भारताचा सांस्कृतिक ठेवा असलेल्या वेरूळ  लेणींचे चित्र असणार आहे. तसेच स्वच्छ भारतचा लोगो आणि घोषवाक्यादेखील छापण्यात आले आहे.  अधिकृत नोट ओळखता यावी यासाठी काही विशिष्ट चिन्हांचा आणि खुणांचा वापर या नोटेवर करण्यात आला आहे.या नोटेवर RBI चे विद्यमान गव्हर्नर शक्तिकांत दास यांची स्वाक्षरी असणार आहे. यासंदर्भातील आरबीआयच्या वेबसाईटवर या नोटेचा फोटो प्रसिद्ध करण्यात आला आहे. तसेच या नोटेच्या वैशिट्य बाबत माहिती देण्यात आली आहे.नव्या नोटा चलनात आल्यानंतरही सध्या बाजारात असलेल्या वीस रुपयांच्या जुन्या नोटा देखील बाजारात असणार आहे, अशी माहिती आरबीआयच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.

 

Add Comment

Protected Content