फैजपूर विकासो चेअरमनपदी केतन किरंगे

फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी शेतकरी विकास पॅनलचे प्रमुख केतन किरंगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

 

फैजपूर येथील विविध कार्यकारी सोसायटी निवडणूक गेल्या आठवड्यात पार पडली. यात शेतकरी विकास पॅनलचे प्रमुख केतन किरंगे यांच्या नेतृत्वाखाली निर्वावाद वर्चस्व मिळाले. विकासोच्या चेअरमनपदी केतन किरंगे तर व्हाईस चेअरमनपदी अप्पा भालचंद्र चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आले.

 

निवड प्रसंगी  संस्थेचे संचालक पांडुरंग सराफ, हेमराज चौधरी, चंद्रशेखर चौधरी, काशीनाथ वारके, नरेंद्र चौधरी, नितीन नेमाडे, विलास महाजन, संतोष मेढे, माधव भोई,  शकुंतला भारंबे, अनिता चौधरी उपस्थित होते, निवडणूक निर्णय अधिकारी एम बी गाढे, संस्थेचे सचिव भागवत कोल्हे, मनोज कुलकर्णी आदी उपस्थित होते. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे आ. शिरीष चौधरी, नरेंद्र नारखेडे, जिल्ह बँकेचे संचालक   विनोद पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Protected Content