जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यासाठी आपत्ती व्यवस्थापन योजना आणावी : जिल्हाध्यक्ष मराठे यांची मागणी

जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यातील तालुकास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये लोकसहभागातून कोविंड सेंटरमध्ये ऑक्सिजनच्या पाईपलाईन उभारणीचे काम करण्याचे सांगितले. आधीच कोरोनाचे संकट त्यात लोकवर्गणी कोण देणार..? आणि केव्हा पैसे जमा होणार..? व केव्हा पाईपलाईनचे काम होऊन रुग्णांचे प्राण वाचविले जातील..? हा मोठा प्रश्नच उभा राहिला असल्याचे एनएसयुआय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी म्हटले आहे.

जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्याची बाजू राज्य आपत्ती व्यवस्थापन परिषदकडे चांगली मांडली तर नक्कीच जिल्ह्याला राज्य सरकारकडे पडून असलेला निधी मिळेल व लोकवर्गणी सारखे थोतांड करण्याची गरजही भासणार नाही असे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी म्हटले आहे. जिल्हाधिकारी भाजप पक्षाच्या चक्रव्यूहात अडकले असल्याचा आरोप त्यांनी केला. जिल्ह्यात भाजप पक्षाचे २ खासदार,४ विधानसभा आमदार, २ विधान परिषद आमदार, २ माजी मंत्री व माजी पालकमंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष, महापौर अशी सर्वच लोकनियुक्त मंडळी आहेत. ही मंडळी जिल्ह्यातील नागरिकांकडे कमी व अधिकाऱ्यांकडे जास्त बसलेली असते. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी “या भाजपाच्या चक्रव्यूह ला तोडून बाहेर निघावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारकडून जास्तीत जास्त निधी जिल्हाधिकारी यांनी जळगाव जिल्ह्यासाठी आणावा जेणेकरून जिल्ह्यातील जे जे रुग्णालय कोरोना सारख्या या महासंकटामध्ये खंबीरपणे उभे राहून जिल्ह्यातील रुग्णांची सेवा करत आहेत अशा रुग्णालयांना या निधीचे वाटप करून जिल्ह्यातील नागरिकांना अधिकाअधिक चांगल्या दर्जाचे उपचार उपलब्ध करून देता येईल असे त्यांनी स्पष्ट केले.

Protected Content