लोहारा विद्यालयात मास्कचे वाटप

 

पाचोरा, प्रतिनिधी । तालुक्यातील लोहारा येथील डॉ. जे. जी. पंडित माध्यमिक विद्यालयात मंगळवार दि. २ फेब्रुवारी रोजी माणुसकी समूहाच्या वतीने मास्क वाटप करण्यात आले

लोहारा विद्यालयात मास्क वाटप प्रसंगी माणुसकी समुहाचे जिल्हाध्यक्ष गजानन क्षीरसागर, कवी मंगलदास मोरे , मुख्याध्यापक आर. एस. चौधरी, विद्यालयाच्या पर्यवेक्षिका यु. डी. शेळके, डी. एम. गरुड उपस्थित होते. मुख्याध्यापक आर. एस. चौधरी यांनी प्रास्तविक केले. विद्यालयातील विद्यार्थ्यांना ण समाजसेवक गजानन क्षीरसागर यांनी त्याच्या कार्याविषयीची माहिती दिली तसेच कवी मंगलदास मोरे यांचा आज जन्मदिवस पण होता. ते शीघ्र कवी असल्याने त्यांनी कोविड – १९ विषयी त्रिसूत्री कविता सादर केली. विद्यालयाचे मुख्याध्यापक पर्यवेक्षिका यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन व्ही. एम. शिरपूरे यांनी आभार पी. एम. सुर्वे यांनी मानले. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content