परसाडे येथील क्रिकेट स्पर्धचे बक्षीस वितरण; शिवशक्ती संघ ठरला अंतीम विजेता

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील परसाडे येथे गावातील पोलीस पाटील महेमूद तडवी यांच्या सहकार्याने छट्टी गृप यांच्या वतीने तालुका पातळीवरील  क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. यात शिवशक्ती संघ हा अंतिम विजेता संघ ठरला.

स्पर्धचे उद्घाटन  माजी पंचायत समितीच्या सदस्या सौ.मिना राजू तडवी.,पंचायत समिती सदस्य शेखर सोपान पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तर याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा परिषद च्या सदस्या सौ.सविता अतुल भालेराव, अतुल भालेराव,पोलीस पाटील महेमूद तडवी, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा वड्री चे मुख्याध्यापक जयंत चौधरी हे होते या स्पर्धत एकुण  पंच मोरे  आणि विविध संघांनी सहभाग घेतला यात संघ हा अंतिम विजेता संघ ठरला असुन या संघास प्रथम क्रमांकाचे बक्षीस देण्यात आली.

सदर क्रिकेट स्पर्धेत यावल तालुक्यातील ३८संघानी सहभाग घेतला . आज दि- ३१ जानेवारी रोजी  स्पर्धचा अंतीम सामना होऊन बक्षिस वितरण करण्यात आले.प्रथम विजेता संघास बक्षिस रू. ५००१, उपविजेते -शिवशक्ती गृप, यावल आणि द्वितीय क्रमाकाचे बक्षिस रू. ३००१ किस्मत गृप ,परसाडे यांना जिल्हा परिषद सदस्या सौ.सविता अतुल भालेराव आणि माजी पंचायत समितीच्या सदस्या सौ.मिना राजू तडवी यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. यावेळी स्पर्धच्या पारितोषीक कार्यक्रमासाठी व संपुर्ण यशस्वी करण्यासाठी आयोजक छट्टी गृप परसाडेचे सदस्य,महेमूद तडवी, जहाबाज तडवी, न्याजोद्दिन तडवी,बबलू तडवी,अजित तडवी,शरीफ तडवी व आदी सदस्यांनी युवकांनी परिश्रम घेतले.

 

Protected Content