…म्हणून कोरोना लढाईत देश आत्मनिर्भर; राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) फेब्रुवारी – नमस्ते ट्रम्प, मार्च – मध्य प्रदेशात सरकार पाडलं, एप्रिल – मेणबत्ती पेटवली, मे – सरकारला ६ वर्ष पूर्ण, जून- बिहारमध्ये व्हर्चुअल रॅली, जुलै – राजस्थानमध्ये सरकार पाडण्याचे षडयंत्र यामुळे देश कोरोनाच्या लढाईत आत्मनिर्भर आहे, अशी टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केली आहे.

 

राजस्थानात सुरु असलेल्या संघर्षात राहुल गांधींनी पहिल्यांदाच भाष्य केले आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करुन मोदी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. कोरोना संक्रमण काळात भाजपा काँग्रेस सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. ) फेब्रुवारी – नमस्ते ट्रम्प, मार्च – मध्य प्रदेशात सरकार पाडलं, एप्रिल – मेणबत्ती पेटवली, मे – सरकारला ६ वर्ष पूर्ण, जून- बिहारमध्ये व्हर्चुअल रॅली, जुलै – राजस्थानमध्ये सरकार पाडण्याचे षडयंत्र, कोरोना काळात सरकारचे यश सांगत राहुल गन्दाही यांनी ट्विट केले आहे. दरम्यान, राहुल गांधी मागील काही दिवसापासून मोदी सरकारवर ट्वीटरच्या माध्यमातून सतत विविध मुद्द्यांवर टीका करत आहेत.

Protected Content