ज्येष्ठ नागरिकांना पहिल्यांदा घरी बसून करता येईल मतदान

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | घरी बसून यावेळी पहिल्यांदा मतदान करता येणार आहे. 80 वर्षांपुढील ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांसाठी घरातूनच मतदान करण्याची सुविधा देणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली. ज्येष्ठ नागरिकांनी निवडणूक घोषित झाल्यानंतर ५ दिवसाच्या आत १२डी क्रमांकाचा अर्ज हा अर्ज जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करावा, अंतिम निर्णय जिल्हाधिकारी घेईल आणि तात्पुरत्या स्वरूपात मतदान केंद्राची उभारणी करेल, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली. निवडणूक जाहीर झाली की १२डी फॉर्म या लोकांना पर्याय निवडण्यासाठी असतील, त्यांना घरपोच फॉर्म दिला जाईल. लोकसभा निवडणूक लवकरची जाहीर होणार आहे. या निवडणूकीची तयारी दीड दोन माहिन्यापूर्वी सुरू झाली आहे. मतदान मोठा उत्सव आहे. वृध्दांनी मतदान केंद्रावर येऊन मत देण्यासाठी प्रयत्न करावे. घरी बसून व्हिडीओ रेकार्ड करून मतदान करता येणार आहे. कोणीही मतदानापासून वंचति राहू नये यासाठी आमचा प्रयत्न आहे असे श्रीकांत देशपांडे म्हणाले. निवडणूकीसाठी पारदर्शकता यावी यासाठी ५० टक्के पोलिस स्टेशन वेब कास्टिंगला जोडली जाणार आहे. निवडणूकीसाठी पोलस दलाची तयारी सुरू आहेत अशी माहिती देशपांडे यांनी दिली.

Protected Content