किल्ले रायगडवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘तुतारी फुंकणारा माणूस’ चिन्हाचे अनावरण

रायगड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शरद पवार यांनी किल्ले रायगडावर तुतारी फुंकणारा माणूस या निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या निवडणूक चिन्हाचे अनावर केले. या कार्यक्रमासाठी शरद पवार स्वतः पालखीतून रायगडावर पोहोचले होते. यावेळी शरद पवार म्हणाले, ही तुतारी एका संघर्षाला सुरुवात करण्यासाठी प्रेरणा देणारी आहे. जनतेसाठी ही आनंदाची तुतारी असेल. राज्याची परिस्थिती बदलण्यासाठी जनतेचे राज्य आणावे लागेल. सध्याचा संघर्ष हा वैचारिक आहे. या देशात अनेक राजे झाले, संस्थानिक झाले परंतु रयतेचा राजा एकच झाला. सध्या राज्यात अडचणी वाढतील अशी स्थिती आहे. शिवछत्रपतींचे राज्य सामान्यांची सेवा करणारे राज्य होते. आज महाराष्ट्राची स्थिती बदलायची असेल तर पुन्हा एकदा याठिकाणी जनतेचे राज्य येईल यासाठी प्रयत्न करावे लागतील. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री राजेश टोपे, खासदार अमोल कोल्हे, आमदादार जितेंद्र आव्हाड यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने तुतारी हे चिन्ह पक्षाला दिले.

Protected Content