मनोज जरांगे यांच्या रास्ता रोको आंदोलनाला राज्यात समिश्र प्रतिसाद

छत्रपती संभाजीनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्रात मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी रास्ता रोकोची हाक दिली आहे. या आंदोलनाला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. सगे-सोयरे लागू करा, ओबीसीतून आरक्षण दया, छत्रपती शिवाजीमहाराज की जय अशा घोषणा देत वेगवेगळया शहरात रास्ता रोको करण्यात येत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला मिळालेल्या १० टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे. त्यांनी सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी केली आहे. त्यांनी राज्यभरात सकाळी १० ते १ वाजपर्यंत रास्ता रोको आंदोलन करून त्यांचे धरणे आंदोलनात रूपांतर करण्याचे आवाहन केले आहे. या रास्ता रोको आंदोलनामुळे राज्यातील वेगवेगळया शहराती वाहतूक विस्कळीत झाली आहे. आंदोलनात महिला, तरूण-तरूणी व लहान मुले मोठया संख्यने सहभागी होत आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, जळगाव, नांदेड शहरात या आंदोलनाला समिश्र प्रतिसाद मिळाला आहे. एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे अशा घोषणा देत सकल मराठा समाज आरक्षणाची मागणी शासनाकडून करत आहे. बारावी बोर्डाच्या परीक्षा डोळयासमोर ठेवून मनोज जरांगे पाटील यांनी ११ वाजेपासून आंदोलन सुरू करण्याचे आवाहन केले आहे.

Protected Content