शेंदुर्णीत शिव भोजन थाळी केंद्राचा शुभारंभ

 

शेंदूर्णी, प्रतिनिधी  । येथे आज महाविकास आघाडी सरकार कडून सुरू असलेल्या महत्वाकांक्षी शिव भोजन थाळी योजनेचा अक्षयतृतीया सणाच्या महुर्तावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जिल्हा नियोजन मंडळ सदस्य संजय गरुड व जळगाव जिल्हा शिवसेना उपप्रमुख डॉ.मनोहर पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

 

शिव भोजन थाळी योजनेच्या शुभारंभप्रसंगी प्रसिद्ध गायक व मेणगाव चे उपसरपंच पी गणेश , शिवसेना उप तालुका प्रमुख डॉ.सुनील अग्रवाल, शेंदूर्णी शहर शिवसेना प्रमुख संजय सूर्यवंशी ,सुनील गुजर,अशोक बारी, अजय भोई,भूषण बडगुजर, बारकू जाधव,सुदर्शन पाटील,सोनू नेरपगारे व इतर शिवसैनिक उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते गरजूंना शिव भोजन थाळीचे वाटप करण्यात आले.

राष्ट्रवादीचे नेते संजय गरुड यांनी सरकारच्या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील गरजू गोरगरिबांना या योजनेचा चांगला आधार होणार असल्याचे सांगितले. तसेच या योजनेसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही देत  सर्वच गरजूंना योजनेचा लाभ दिला जाईल असे आश्वासित केले.  महाविकास आघाडी सरकार कोरोना संकटाशी दोन हात करीत असतांना सुद्धा गोरगरिबांची काळजी घेत असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.  शिवसेना उपजिल्हा प्रमुख डॉ. मनोहर पाटील यांनी  कोरोना काळात महाविकास आघाडी सरकार गरजूंना शिव भोजन थाळी मोफत पुरवून खऱ्या अर्थाने गरिबांकडे लक्ष देत असल्याचे सांगितले.  मेणगाव उपसरपंच पी. गणेश यांनीही महाविकास आघाडी सरकारच्या उपक्रमाचे कौतुक केले. शेंदूर्णी शहर शिवसेना प्रमुख संजय सूर्यवंशी यांनी आभार मानले. शिव भोजन थाळी योजनेत आज अक्षय तृतीया निमित्ताने आंब्याचा रस व पुरी हा मेनू शिव थाळीतून देण्यात आला. ग्रामीण भागात सुरू झालेल्या योजने बद्द्ल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

 

Protected Content