पाचोरा येथे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर

पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भडगाव रोड वरील छत्रपती संभाजी महाराज चौकात असलेल्या नियोजित पुतळ्याजवळ छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमापूजन व रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी आमदार किशोर पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, भाजपा तालुका अध्यक्ष अमोल शिंदे, विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलचे संचालक डॉ. भूषण मगर, राष्ट्रवादी काँग्रेसचे रणजीत पाटील, शिवसेना शहर प्रमुख किशोर बारावकर यांचे सह संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी छत्रपतींना अभिवादन करत माल्यार्पण केले.

याप्रसंगी आर्यन ग्रुपचे आर्यन मोरे व सहकाऱ्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले  होते. यावेळी अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करत आपल्या सामाजिक जबाबदारीचे कर्तव्य पार पाडले. कार्यक्रमस्थळी कोरोना नियमांचे पालन करण्यात येऊन सामाजिक अंतर पाळत सर्वांनी कार्यक्रमात सहभाग दर्शवला. दरम्यान महाविकास आघाडीचे नेते आमदार किशोर पाटील व माजी आमदार दिलीप वाघ यांनी काही काळ असपसात हितगुज केले. त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली असावी या बाबत उपस्थित कार्यकर्त्यांत कुजबुज सुरू होती.

Protected Content