प्रभाकर आप्पांचे चोपडा शहरात शक्ती प्रदर्शन

5a1da328 b678 4048 97b7 2b40b56eb069

 

चोपडा (प्रतिनिधी) जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती तथा चोपडा विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार प्रभाकर सोनवणे यांनी चोपडा विधानसभा क्षेत्र पिंजून काढला आहे. आज शहरात सकाळ पासून प्रचार करतांना भव्य रॅलीच्या माध्यमातून त्यांनी शक्ती प्रदर्शन केले. शहरातील या रॅलीत शिवसेना-भाजपातील बड्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवल्यामुळे राजकीय चर्चेला उधान आले आहे.

 

विधानसभेच्या प्रचारात प्रभाकर आप्पांनी ग्रामिण भागात मोठ्या प्रमाणावर आघाडी घेतली आहे. ग्रामीण भागात स्ववस्फूर्तीने प्रभाकर आप्पाशी हात मिळवणी करत आम्ही तुमच्या सोबतच आहोत,असे सांगत असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे. सक्षम, शांत,व विकासाचे व्हिजन असणाऱ्या सोबत आम्ही आहोत असे सांगत ग्रामीण भागात उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचेही सोनवणे यांचे समर्थक म्हणताय.

 

प्रभाकर सोनवणे हे आदिवासी पाड्यापर्यंत प्रचाराच्या माध्यमातून घराघरात पोहचले आहेत. त्यांच्या प्रचाराकरिता शिवसेना नेते तसेच चोपड्याचे माजी आमदार कैलास बापू पाटील, चंद्रशेखर युवराज पाटील, शिवसेनाच्या नेत्या इंदिराताई पाटील, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष अमृतराज सचदेव, भाजपाचे मुलुख मैदान तोफ शांताराम पाटील, भाजपाचे गजेंद्र सोनवणे, आत्माराम म्हाळके, नगरसेवक गंजेंद्र जैस्वाल, शेतकी संघाचे माजी चेअरमन हिम्मतसिंग पाटील, शांताराम सपकाळे यांच्या सोबत अनेक दिग्गज नेत्यांसह कार्यकर्ते सहभाग घेताय.
यावेळी त्यांच्या सोबत प्रकाश रजाळे, मनीष पारीख ,तुषार पाठक, प्रल्हाद पाटील, सुभाष कोळी, सुनील सोनागिरे, कल्पना कोळी, रवी मराठे,पप्पु पाटील, डी. पी.साळुंखे, विष्णु पाटील, लक्ष्मण पाटील, रमाकांत बोरसे, डॉ राहुल पाटील,गोपाल भाट, देवेंद्र सोनवणे , डॉ आशिष पाटील, नरेंद्र पाटील, भागवत पाटील, सुनील पाटील, भारती शिरसाठ, आदी हजारो महिला, पुरुष, नवयुवक दिसत होते या प्रचार रॅली द्वारा शहरात शक्ती प्रदर्शन झाले आहे विरोधाकाना धडकी भरली आहे

Protected Content