दहावी आणि बारावीच्या गुणपत्रिकेवरील ‘अनुत्तीर्ण’ शेरा होणार हद्दपार

students march clipart

मुंबई वृत्तसंस्था । दहावी आणि बारावीच्या गुणपत्रिकेवर आता “नापास” किंवा “अनुत्तीर्ण” शेरा हद्दपार होणार असून नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या मार्कशीटवर आता ‘कौशल्य विकासास पात्र’ असा शेरा दिला जाणार आहे.

महाराष्ट्रा शासनाचा हा निर्णय यापूर्वी केवळ दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मर्यादित होता. मात्र नुकतेच महाराष्ट्र शासनाने बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीही याबाबतचा निर्णय जाहीर केला आहे. याबाबतचा शासन निर्णय कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने जारी केला असून तसा प्रस्ताव राज्य शिक्षण मंडाळाकडे पाठवण्यात आला आहे. दहावी आणि बारावीचे शैक्षणिक वर्ष विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे व जीवनाला वळण देणारा एक मोठा टप्पा असतो. या टप्प्यावर अनुत्तीर्ण झाल्यास समोरच्या भविष्याच्या वाटचालीत अडथळे निर्माण होतात. अशा तरुणांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, आणि स्वत:च्या पायावर उभे राहण्याची क्षमता निर्माण व्हावी, यासाठी दहावी आणि बारावी उत्तीर्ण न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांकरिता कौशल्य सेतू कार्यक्रम योजना राबवण्यात येणार आहे. यापूर्वी शिक्षण विभागाने 27 सप्टेंबर 2018 रोजी शासन निर्णय जारी करुन दहावी परीक्षेत तीन किंवा त्यापेक्षा अधिक विषयांमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ‘कौशल्य विकासास पात्र’ असा शेरा देण्याचे नमूद केले आहे.

Protected Content