सात लाखांच्या गुटख्यासह एकाला अटक

पाचोरा- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातून दोन वाहनांमधून सुमारे सात लाखांच्या गुटख्यासह एकाला अटक करण्यात आली असून ही कारवाई अन्न व औषध प्रशासनातर्फे करण्यात आली.

या संदर्भातील माहिती अशी की, नाशिक येथील अन्न सुरक्षा अधिकारी तथा गुप्त विभागाचे अविनाश दाभाडे आणि जळगाव येथील अन्न सुरक्षा अधिकारी किशोर साळुंखे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी काल सायंकाळी पाचोरा शहरात संयुक्त कारवाई केली.

पाचोरा शहरातील सिंधी कॉलनी भागात एमएच १९ सीवाय ००८९ (छोटा हत्ती) व एमएच १५ सीएम ८०२० (मारुती ओम्नी) या क्रमांकांची दोन वाहने संशयास्पदरीत्या आढळली. त्यांनी या वाहनांची तपासणी केली असता त्यात राज्यात बंदी घातलेला गुटखा, पानमसाला आढळून आला. या मालाची किंमत ७ लाख ७ हजार १९५ रुपये एवढी असून दोन्ही वाहनांसह १० लाख ४७ हजार १९५ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या मुद्देमालासह सनी नावाच्या एका तरूणाला ताब्यात घेण्यात आले आहे.

या संदर्भात रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Protected Content