भुसावळकर राजीव शर्मा यांना रोटरीचा सर्वोच्च पुरस्कार

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील राजीव शर्मा यांना आंतरराष्ट्रीय रोटरीचा ‘सर्व्हिस अबाउ सेल्फ’ हा सर्वोच्च पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा

राजीव शमा यांनी रोटरीमध्ये काम करतांना आपल्या कामाचा अमीट ठसा उमटवला आहे. ते १९९४ पासून या संस्थेत सक्रीय सहभागी झाले आहेत. आजपर्यंत त्यांनी ३५ ग्रँड मॅचिंग प्रोजेक्ट, २० ग्लोबल ग्रँड प्रोजेक्ट यशस्वीरीत्या पूर्ण केले. डिस्ट्रिक्ट ३०३० चे आर्च क्लब सोसायटी सदस्य होण्याचा प्रथम बहुमान त्यांना मिळाला.

पोलिओ निर्मूलन असो व कोविड लसीकरण यात सातत्याने सेवा सुरू आहे. आंतरराष्ट्रीय रोटरीच्या प्राधान्य असलेल्या प्रमुख क्षेत्रांमध्ये त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. ते रोटरी फाउंडेशनचे आंतरराष्ट्रीय रिजनल कोऑर्डिनेटर आहेत. त्यांना गतवर्षी डिस्टिंग्विश सर्व्हिस अवॉर्ड मिळाला होता. यानंतर आता त्यांना रोटरीच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. आजवर त्यांनी अध्यक्षांपासून ते प्रांतपाल पदापर्यंत झेेप घेतली. विविध पदांवर त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.
दरम्यान, हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅलीचे अध्यक्ष डॉ.संजू भटकर, सचिव जीवन महाजन यांच्यासह इतर रोटेरियन्सनी त्यांचे कौतुक केले आहे.

Protected Content