माहिती आणि सायबर सुरक्षेवर एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनार

जळगाव, प्रतिनिधी ।   के.सी.ई . सोसायटी संचालित अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन जळगाव आणि एस. एस. मणियार लॉ ( विधी)  कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानातून “माहिती आणि सायबर सुरक्षा “या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनार ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आला. 

 

वेबिनारसाठी प्रमुख प्रवक्ता म्हणून ‘ई क्लिनिकल वर्क’ नालापाड येथे कार्यरत असलेल्या कार्थी एम. आणि  एस. एस. मणियार लॉ ( विधी)  कॉलेजचे प्रा. डॉ. विजेता एस. सिंग यांचे मार्गदर्शन लाभले.  सौ. कार्थी एम. यांनी सायबर सुरक्षेचे विविध प्रकार म्हणजे फिशिंग, मालवेअर याबद्दल माहिती दिली. तसेच आपण सायबर अटॅकचे कारण का व कसे होतो याचे महत्व सांगताना अन ऑथराईस फिजिकल  ऍसेस व प्रमाणीकरण यावर विशेष लक्ष केंद्रित केले.  प्रा. डॉ. विजेता एस. सिंग  यांनी वरील विषयाला अनुसरून सायबर सुरक्षेचे विविध प्रकार, सोशल मीडियावरून होणारे गुन्हे आणि महिलांवर हिंसाचाराच्या संकल्पनेवर सायबर बळीचा परिणाम कसा होतो व त्यापासून कसे सुरक्षित राहावे व त्यावर आधारित विविध कलम यावर सविस्तर माहिती दिली. वेबिनारची रूपरेषा मांडताना एस. एस. मणियार लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. बी. युवकुमार रेड्डी यांनी सायबर लॉ या विषयावर सविस्तर माहिती दिली. तसेच अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन कॉलेजचे प्राचार्य डॉ. के.पी. राणे यांनी सायबर टेकनॉलॉजि तसेच नियम यावर आपले मनोगत दिले.  या उपक्रमात १६५ विद्यार्थी आणि प्राध्यापकांची उपस्थिती होती. या वेबिनारसाठी प्रा. के. एम. महाजन, प्रा. गणपत धुमाळ कॉलेजचे आय. क्यू. एस सी कोऑर्डिनेटर डॉ. प्रज्ञा विखार आणि डॉ.  डी. आर.  क्षीरसागर आणि डॉ . प्रा. संजय सुगंधी यांचे सहकार्य लाभले. प्रा. सचिन एम. नाथ व दिवाकर राणे यांचे तांत्रिक सहकार्य लाभले. सूत्रसंचालन प्रा. पूजा नवाल यांनी केले.

 

Protected Content