राष्ट्रीय संत सुरक्षा परिषदेच्या जिल्हा युवा सहमीडियापदी रविंद्र कोलते

फैजपूर ता.यावल । राष्ट्रीय संत सुरक्षा परिषदेच्या जळगाव जिल्हा युवा सहमिडिया प्रभारी संत सहयोगी प्रकोलपदी रविंद्र कोलते यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती राष्ट्रीय संत सुरक्षा परिषदेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष स्वामीराज राजेश्वर गिरीराज महाराज यांच्या आदेशान्वये या परिषदेचे राष्ट्रीय महासचिव डॉ. पद्मनाभ गिरी महाराजांनी केली आहे.

यावल तालुक्यातील न्हावी येथील रहिवाशी असलेले युवा सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार रविंद्र घन:श्याम कोलते यांची निवड झाल्याबद्दल सर्व अभिनंदन होत आहे. राष्ट्रहित, जनहित आणि धर्म हित समोर ठेवून सेवा, संस्कार, सुरक्षा हे तीन गुण आत्मसात करून परोपकाराची कार्य या माध्यमातून करणार असल्याचे, तसेच मी पूर्ण प्रामाणिकपणे निष्ठेने, अंतकरणापासून या माध्यमातून संत सेवा समाजाची तन-मन-धनाने अविरत सेवा करणार असल्याच रविंद्र कोलते यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. या सुरक्षा परिषदेच्या माध्यमातून संतांचा, धर्माचे व मानव जातीचे रक्षण करणे, त्यांना सुरक्षा प्रदान करणे, अध्यात्माचा प्रचार आणि प्रसार करणे, आदर्श समाजाची आणि भारताच्या निर्मितीसाठी या परिषदेच्या माध्यमातून संतांचा निरूपण संतांची शिकवण आणि संस्कार घराघरांमध्ये, मना-मनामध्ये जनतेपर्यंत पोहोचविणे, साधुसंतांवर होणाऱ्या अमानुष अत्याचाराविरुद्ध लढा देणे, साधुसंतांना त्यांचा हक्क मिळवून देणे, विविध कथा कीर्तन प्रसंगांच्या आयोजन करणे, सामाजिक उपक्रम राबवणे, साधुसंतांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात पूर्ततेसाठी पाठपुरावा करणे, ही आणि अशी अनेक उद्दिष्टे राष्ट्रीय संत सुरक्षा परिषदेची आहेत त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते व कलावंत तुषार वाघुळदे, निलेश फिरके , चंद्रकांत चौधरी श्री.चोपडे आदींनी अभिनंदन केले आहे.

Protected Content