सुशांत सिंह राजपूत आत्महत्या : रिया चक्रवर्तीची अटकपूर्व जामीनासाठी धाव !

मुंबई (वृत्तसंस्था) अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात आपल्या मुलाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर रियाने अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी धावपळ सुरु केल्याचे वृत्त आहे. रात्री उशिरा तिने आपल्या वकिलाची भेट घेत सर्व कागदपत्र तयार केल्याचे कळते.

 

रियावर एफआयआर दाखल झाल्याचे कळताच बिहार पोलिसांनी कारवाईसाठी मुंबई गाठली आहे. त्यामुळे रिया चक्रवर्ती हिने अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठीचे प्रयत्न सुरु केली आहे. रियाने सुशांतची फसवणूक केल्याच्या संशलयायवरुन आणि त्याचा मानसिक छळ केल्याचा आरोप करत तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सुशांतच्या वडिलांनी तक्रारीत रिया चक्रवर्तीने सुशांतकडून पैसे घेतल्याचा आरोप केला आहे. तसेच सुशांतला धमक्या दिल्याचेही म्हटले आहे. त्यानंतर आता अटकपूर्व जामिनासाठी रियाने प्रयत्न सुरू केले आहेत. रियाने मंगळवारी रात्री वकील सतीश मानशिंदे यांची भेट घेतली असून बुधवारी ती अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार आहे.

Protected Content