पूर्वजन्मातील कर्मांच्या आधारे ब्राह्मणांचा दोनदा जन्म : न्या. व्ही. चितंबरेश

70374933

कोची (वृत्तसंस्था) ब्राह्मण व्यक्तीचा दोन वेळा जन्म होतो. पूर्वजन्माच्या कर्मांच्या आधारे ब्राह्मणांचा दोनदा जन्म होतो आणि ब्राह्मणांमध्ये असंख्य संद्गुण असतात’, असे मत केरळ हायकोर्टाचे न्यायाधीश व्ही. चितंबरेश यांनी केल्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केरळच्या ब्राह्मण सभेने आयोजित केलेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात न्यायाधीश चितंबरेश आपले म्हणणे मांडत होते.

 

यावेळी न्या. चितंबरेश पुढे म्हणाले की, आर्थिकदृष्ट्या मागास समाजाला १० टक्के आरक्षण देण्याची व्यवस्था देशात करण्यात आली आहे. एखाद्या ब्राह्मण कुकचा मुलगा क्रिमी लेअरमध्ये येत असल्यास त्याला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. मात्र, एका लाकडाच्या व्यापाऱ्याचा मुलगा जो मागास वर्गात येतो, त्याला मात्र आरक्षणाचा फायदा नक्कीच मिळेल. हे पाहता तुम्ही पुढे आले पाहिजे, कारण याबाबत आपला आवाज उठवण्याची हीच योग्य वेळ आहे. ब्राह्मणांना जात अथवा धर्म यांच्या आधारे आरक्षण न देता ते आर्थिक निकषांवर आधारित देण्यात यावे, असेही ते म्हणाले. सर्व ब्राह्मणांनी आरक्षणाचा आधार काय असला पाहिजे? यावर प्रश्न उपस्थित केले पाहिजेत, असेही चितंबरेश पुढे म्हणाले.

Protected Content