पाचोरा तालुका बाल हक्क संरक्षण संघ कार्यकारणी निवड व पदग्रहण सोहळा

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बाल हक्क संरक्षण संघ पाचोरा तालुक्याच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते निलेश मराठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संघाचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष हर्षल पटवारी, संस्थापक सरचिटणीस प्रा. ज्ञानदेव इंगळे, राज्य उपाध्यक्ष शामिभा पाटील, राज्य सचिव मुकेश जगताप यांच्या उपस्थितीत रविवार दि. ७ ऑगस्ट रोजी पाचोरा येथील विश्रामगृहात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात पाचोरा तालुका चाळीसगाव तालुका व जामनेर तालुका यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या.

बाल हक्क संरक्षण संघ महाराष्ट्र राज्यचा मूळ मुख्य उद्देश ‘बालकांच्या अधिकाराचं रक्षण करून बालकांचे बालपण वाचवण्यासाठी बालस्नेही समाजाची निर्मिती करणे.’ हा आहे. याअंतर्गत बालकामगार बालभिक्षी करून विधी संघर्षित बालक यांची काळजी व संरक्षणाची गरज असलेले बालक यांच्यासाठी मोहीम राबवण्याचा संघाचा मानस आहे. बालका संबंधित विविध विषयावर सरकार व अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघ सदैव तत्पर राहील. असे प्रतिपादन हर्षल पटवारी यांनी यावेळी केले.

याप्रसंगी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी शमिभा पाटील, महाराष्ट्र राज्य सचिव पदी मुकेश जगताप, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष पदी चाळीसगावचे गणेश अग्रवाल तसेच पाचोरा तालुका कार्यकारणी चाळीसगाव तालुका व जामनेर तालुक्याच्या कार्यकारणीची नियुक्ती करण्यात आली.

पाचोरा तालुक्यातील नियुक्त्या पुढीलप्रमाणे –  

निलेश मराठे – पाचोरा तालुकाध्यक्ष

दिपक परदेशी – उप तालुकाध्यक्ष

नंदकुमार शेलकर – पाचोरा शहराध्यक्ष

जितेंद्र पाटील – पाचोरा शहर उपाध्यक्ष

आकाश पवार, सचिव शिव पाटील – कार्यालय प्रमुख

अॅड. मानसिंग सिद्धू – कायदे विषयक सल्लागार 

विविध कला क्षेत्रातल्या नियुक्त्या –

जितेंद्र काळे, राहुल पाटील, सुशांत जाधव, दुषण खंडेलवाल यांच्या विविध क्रीडा नृत्य व कलाक्षेत्र तालुकाप्रमुख पदी निवड करण्यात आल्या. नियुक्ती प्रसंगी संस्थापक तथा प्रदेश अध्यक्ष हर्षल पटवारी व महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष शमिभा पाटील यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

चाळीसगाव येथील राज्य परिवहन मंडळातील कर्मचारी विजय मदनलाल शर्मा यांच्या कार्याची दखल त्यांना राष्ट्रपती पुरस्कार देऊन करण्यात आली होती. त्यांचा कार्याचा गौरव म्हणून संगमार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला. नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष निलेश मराठे यांनी बाल हक्क संरक्षण संघाच्या मुख्य उद्दिष्टांसाठी सर्वांच्या सहकार्याने परिश्रम घेऊन पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करू. असे आश्वासन देत उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

Protected Content