विनापरवाना औषधी विक्री करणाऱ्याला अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात बेकायदेशीर व विनापरवाना दवाखाना चालवून औषधी विक्री करणाऱ्या एकाला विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर यांच्या पथकाने धडक कारवाई करत अटक केली आहे. संशयित आरोपीकडून विनापरवाना औषध विक्रीचा एकुण २३ हजार ८६८ रूपयांची मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरमधील शिवाजी नगरातील सुरभी कॉम्प्लेक्स येथे संशयित आरोपी शमशीर कादीर शेख (वय-४१) रा. कौसा मुंब्रा, ठाणे हा व्यक्ती विनापरवाना बी.यु.एम.एस. डॉक्टर असलेले डॉ. शेख अमजद शेख अहमद रा. बुऱ्हाणपूर, मध्यप्रदेश यांच्या नावाने रजिष्ट्रेशन केलेल सर्टीफिकेट लावून डॉक्टरच्या नावाखाली रूग्णांना चुकीचे औषध देते असल्याची गोपनिय माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने मंगळवारी 7 फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता धडक कारवाई केली. पथकाने संशयित आरोपी शमशीर कादीर शेख याला ताब्यात घेतले. त्याकडून विनापरवाना विक्रीसाठी आणलेले २३ हजार ८६८ रूपये किंमतीचे औषधींचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात आरोग्य अधिकारी बाळासाहेब श्यामकांत बावळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शमशीर कादीर शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content