डॉ. सायली भिरूड यांचा डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजतर्फे सत्कार

जळगाव प्रतिनिधी । डॉ. सायली सौरभ भिरूड यांनी एम.डी. मेडिसीनमध्ये विशेष प्राविण्य मिळवल्याबद्दल त्यांचा डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजतर्फे सत्कार करण्यात आला.

मुळ विवरा व भुसावळ येथील रहीवासी असलेल्या डॉ.सौरभ व डॉ. सायली भिरूड यांनी उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयास सदिच्छा भेट दिली.माजी खासदार डॉ उल्हास पाटील व अधिष्टाता डॉ एन एस आर्विकर यांनी रूग्णालयातर्फे डॉ सायली सौरभ भिरूड यांनी एम. डी. मेडीसिन या विषयात प्राविण्य मिळवल्याबददल सत्कार केला.

डॉ सायली या भुसावळ येथील प्रगत शेतकरी सतीश महादू पाटील यांची कन्या तर विवर्‍याचे प्रगतशिल शेतकरी मार्तंडराव भिरूड यांची नातसून आहे. त्यांनी जे.जे. मेडीकल कॉलेजमधून एम बी बी एस व शासकिय वैद्यकिय महाविद्यालय मिरज मधून मेडीसिन विषयात पदव्यत्तर प्राप्त केल्यानंतर शासकीय वैद्यकिय महाविद्यालय मिरज येथे कार्यरत आहे. कोविड आपत्तीच्या काळात अनेक रूग्णांवर त्यांनी उपचार केले आहे.

डॉ किरण, डॉ.अंजली भिरूड, प्रसिध्द लेखिका सरला भिरूड व अभियंता दिपक भिरूड यांचा पुतण्या डॉ सौरभ भिरूड यांनी देखिल एम. डी. मेडीसिन क्रिटीकल केअर सुपर स्पेशालीटीत पुर्ण केले असून ते विवरा येथील रहीवासी आहे. भिरूड कुटुंबात त्यांच्या रूपाने उच्च शिक्षण घेणारी तिसरी पिढी असून त्यांना चंद्रभागाबाई भिरूड, गोदावरी फॉउंडेशनच्या प्रेरणास्त्रोत गोदावरी पाटील तसेच मार्तंडराव भिरूड यांचे सतत मार्गदर्शन लाभले आहे.

अत्यंत हुशार व स्कॉलर अशा भिरूड दापत्याने नुकतीच डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय कोविड रूग्णालय व महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली त्यांच्या कोविड योगदानाबददल तसेच डॉ सायली सौरभ भिरूड यांनी एम डी मेडीसिन विषयात प्राविण्य मिळवल्याबददल महाविद्यालयातर्फे माजी खा. डॉ उल्हास पाटील, अधिष्ठाता डॉ. एन एस आर्विकर, स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉ. माया आर्विकर यांनी सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्यात. यावेळी दोघांनीही कोविड रूग्णांची सेवा व उपलब्ध सुविधाबददल समाधान व्यक्त करून मार्गदर्शनाची आवश्यकता भासल्यास सहकार्याचे आश्‍वासन दिले.

Protected Content