‘त्या’ अनोळखी मृतदेहाची ओळख पटली

sucide

जळगाव प्रतिनिधी | शहरातील कालिंका माता मंदीराजवळ असलेल्या हॉटेल पॅराडाईससमोर शनिवारी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास अंदाजे ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची ओळख पटली असून रूपा झिपरू ठाकरे (वय-70) असे मयताचे नाव आहे.

 

याबाबत माहिती अशी की, रूपा ठाकरे हे मुळ धरणगाव तालुक्यातील वाघळूद येथील रहिवाशी असून तांबापूरात राहणारा मुलगा युवराज ठाकरे यांच्याकडे भेटण्यासाठी आले होतो. मानसिक संतुलन व्यवस्थीत नसल्याने शनिवारी सकाळीच मुलाच्या घरून बाहेर पडले होते. सायंकाळी 4.30 वाजेच्या सुमारास कालिंका माता मंदीर परीसरात त्यांचा अनोळखी म्हणून मृतदेह आढळून आला होता. एमआयडीसी पोलीसांनी ओळख पटविण्याचे आवाहन केले होते. आज पहाटे मुलगा युवराज ठाकरे यांनी मृतदेह ओळखला असून सायंकाळी शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत एमआयडीसी पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास एपीआय विशाल सोनवणे करीत आहे.

Protected Content