भुसावळ नगर परिषदेच्या पडाऊ इमारतीमुळे नागरिकांना धोका (व्हिडीओ)

42682fd4 5abe 4767 bf9b 4b0afe449430

भुसावळ, प्रतिनिधी | येथील नगर परिषदेची इमारत जुनी आणि जीवघेणी झाली असून ही इमारत कधी ढासळेल व त्यामुळे मोठा अपघात होईल, ते सांगता येत नसल्याने येथून वहिवाट असलेल्या नागरिकांवर ही टांगती तलवार कायम आहे.

 

शहरातील खडका रोड, जममोहल्ला, या भागाकडे जाण्यासाठी तसेच वरणगाव व मुक्ताईनगरकडे जाण्यासाठी दुसरा पर्यायी रस्ता नसल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस व अन्य वाहनांना ह्याच रस्त्याने जावे-यावे लागते. या इमारतीच्या खालील बाजूस दुकानदार जीव मुठीस धरून आपला व्यवसाय करीत असून नगर परिषदेने दुकानदारांना जागा सोडण्यासाठी नोटीस बजावलेल्या आहेत. हे जुने भाडेकरू असल्याने नगर परिषदेने त्यांची लवकरात लवकर पर्यायी व्यवस्था करून देणे गरजेचे आहे. जो पडण्यासारखा भाग आहे, त्याला आधीच पाडून दुरुस्त केल्यास अपघाताची शक्यता कमी होणार आहे. मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनी या समस्येकडे त्वरित लक्ष देण्याची गरज आहे.

 

 

 

 

Protected Content