ए.टी. झांबरे महाविद्यालयात सात दिवसीय योग शिबीराचा समारोप

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात सोहम डिपार्टमेंट ऑफ योग ॲण्ड नॅचरोपॅथी अंतर्गत सात दिवसीय योग शिबीराचा शुक्रवार ११ मार्च रोजी समारोप करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सोहम डिपार्टमेंट ऑफ योग ॲण्ड नॅचरोपॅथी विभागाचे प्रमुख प्रा.डॉ. देवानंद सोनार यांची उपस्थिती होती.

यावेळी प्रा. डॉ.देवानंद सोनार यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, आजच्या स्पर्धात्मक युगात स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रत्येकजण धावतो आहे. मात्र यात स्वतःच्या आरोग्याकडे दूर्लक्ष झाल्याने अनेक शारीरिक व्याधी डोकेवर काढत आहे. ते टाळण्यासाठी “जो करेल योग त्यापासून दूर होईल रोग’ असे मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. यावेळी मंचावर ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालयाच्या मुख्यध्यापिका प्रणिता झांबरे उपस्थित होत्या. या सात दिवसीय शिबिरात विद्यार्थ्यांना प्राणायाम, अनुलोम- विलोम, भ्रामरी, प्राणायाम, ओंकार, श्वसनाचे प्रकार आदी योग साधना शिकविण्यात आल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी देखील मनोगत व्यक्त केले.

सूत्रसंचालन प्रमिला सोनवणे तर आभार ज्योती चौधरी यांनी मानले. या शिबिराला विभाग प्रमुख प्रा देवानंद सोनार, प्रा.पंकज खासबागे, प्रा. ज्योती वाघ, सोनल महाजन, अनंत महाजन यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वीतेसाठी एकटा कवठे, जोती चौधरी, प्रमिला सोनवणे, सचिन कोल्हे यांनी परिश्रम घेतले.

Protected Content