सौरभ पाटील यांचा महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी केला सत्कार

 

फैजपूर, प्रतिनिधी । आई वडिलांची पुण्याई व अथक परिश्रमातून यश संपादन केलेला सौरभ उमाकांत पाटील हा आपल्या देशासाठी भविष्यातील तेजस्वी तारा असल्याचे परम पूज्य संत महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले. येथील सतपंथ मंदिर संस्थानमध्ये त्याचा थोर पराक्रमी रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, शाल, श्रीफळ, पेन भेट देऊन सत्कार केला.

पुणे विद्यापीठातून एमएस्सी परीक्षेत सर्वप्रथम येऊन त्याने नेट-जेआरएफ परीक्षेत भारतातून सहाव्या क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळविला आहे. जळगाव जिल्ह्यासाठीच नव्हे तर आपल्या देशासाठी गौरवास्पद बाब म्हणजे  बंगलोर येथील जगप्रसिद्ध तथा नामवंत संशोधन संस्था  “इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स” (आयआयएससी) यामध्ये  ‘हवामान व अवकाश शास्त्र’ या उपयुक्त विषयात संशोधन कार्यासाठी त्याची निवड झाली आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित गुरुदेव सेवाआश्रम जामनेरचे गादीपती प. पू. श्री श्याम चैतन्यजी महाराज,  कन्नड सेवाश्रमाचे अध्यक्ष सर्व चैतन्यजी महाराज यांनीही सौरभला आशिर्वाद दिला. याप्रसंगी सौरभचे वडील प्रा. उमाकांत पाटील, आई सुनीता पाटील, प्रविण किरंगे, मुखी परिवार आदी उपस्थित होते.

 

 

 

 

 

Protected Content