जळगावातील कमल पॅराडाईज हॉटेलला ५० हजारांच्या दंडाची नोटीस

जळगाव प्रतिनिधी । शहरातील कमल पॅराडाईज हॉटेल येथे लग्न समारंभास ५० पेक्षा जास्त नागरिकांची उपस्थितीसह कोरोनाचे नियमांचे उल्लंघन झाल्याने हॉटेलवर सील करण्याची कारवाई करण्यात आली होती यानंतर आता कमल पॅराडाईज हॉटेलला ५० हजार रुपये दंडाची नोटीस महापालिकेकडून बजाविण्यात आली आहे. 

नोटीस मिळाल्यापासून २४ तासाच्या आत समाधानकारक खुलासा सादर करावा, अथवा फौजदारी स्वरुपाची कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही नोटीसव्दारे देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसर महापालिकेचे उपायुक्त संतोष वाहुळे यांनी दि. २१ रोजी पोलीस निरिक्षकांसह जळगाव-भुसावळ रोडवरील कमल पॅराडाईज या हॉटेलची पाहणी केली होती. याठिकाणी कोरोनाचय पार्श्‍वभूमिवर फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करता ५० पेक्षा जास्त नागरिक गर्दी करुन दिसून आले. तसेच मास्कचाही वापर कुणाकडून करण्यात येत नसल्याचे दिसून आले. कोरोनाचे नियमांचे उल्लंघन केल्याने संतोष वाहुळे यांनी कमल पॅराडाईज हॉटेल सील करण्याची कारवाई केली होती. यानंतर सदरच्या हॉटेल नियमाअंतर्गत महापालिकेकडून ५० हजार रुपये दंडाची नोटीस बजाविण्यात आली आहे. २४ तासाच्या आत समाधानकारक खुलासा सादर करावा, अन्यथा होणार्‍या फौजदारी कारवाई आपणच जबाबदार राहाल, असेही महापालिका उपायुक्त संतोष वाहुळे यांनी नोटीसीव्दारे कळविले आहे.

Protected Content