Home Cities धरणगाव भोद खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप !

भोद खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप !

0
120

धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भोद खुर्द येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत आदरणीय पापा शेठ वाघरे व मित्रपरिवार यांच्या सौजन्याने हा उपक्रम राबविण्यात आला.

विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध व्हावे आणि त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. त्यांनी या उपक्रमाबद्दल दात्यांचे आभार व्यक्त केले.

शाळेच्या मुख्याध्यापकांसह शिक्षकांनी पापाशेठ वाघरे व मित्रपरिवार यांच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अशा प्रकारचे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असून भविष्यातही असे उपक्रम सुरू राहावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमाला सुरज वाघरे, भैय्या वैदू, चेतन महाराज वाघरे, मोरे मामा यांच्यासह शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणाऱ्या या उपक्रमामुळे शाळा परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले.


Protected Content

Play sound