नशिराबाद गावठाणातील मालमत्ता धारकांना सत्ताप्रकार ‘क’ मध्ये समाविष्ट करा – राष्ट्रवादीची मागणी

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नशिराबाद गावातील गावठाण शिवारातील भवानी नगर, निमजाय माता नगर, पेठ, फुकटपुरा येथील नमुना नं ८ अ नुसार उतारे असणाऱ्या मालमत्ता धारकांना सत्ताप्रकार ‘क’ मध्ये समाविष्ट करण्यात यावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जळगांव तहसीलदार नामदेव पाटील याना निवेदन दिले आहे.

शुक्रवार, दि.११ मार्च रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “नशिराबाद शिवारातील गावठाण जमिनीवर बऱ्याच वर्षांपासून लोकवस्ती झालेली आहे. या लोकांना शासनाच्या विविध योजनांमधून ग्रामपंचायत दप्तरी नमुना नंबर ८ ‘अ’ समाविष्ट होऊन उतारे वितरित करण्यात आले आहेत. सुमारे ५० वर्षांपासून नागरिक या ठिकाणी वास्तव्य करीत असून ग्रामपंचायतीमार्फत त्यांच्याकडून कर आकारणी वसुली केली जात आहे. परंतु सदर जागा त्यांना फक्त रहिवास हेतूपुरतीच कमी येत असून जागेचा उतारा बांधकामासाठी कर्ज घेण्यासाठी किंवा इतर शासकीय पुराव्यासाठी त्यांचा उपयोग होत नाही. नशिराबाद गावातील नसता भवानी नगर, निमजाई मातानगर, पेठ भाग तसेच फुकटपुरा भागातील रहिवासी गावठाण शिवारातील जागेवर वास्तव्य करीत असून त्यांना शासन निर्णयानुसार सत्ता “ब” चा दर्जातून मालमत्ता सत्ता “क” दर्जा मध्ये समाविष्ट करावा, जेणेकरून त्यांना उतारा परिपूर्ण देखा स्वतःच्या नावे मिळेल.

नशिराबाद गावातील सुमारे १ हजार कुटुंबे आतापर्यंत या निर्णयापासून वंचित आहेत. संबंधित मालमत्ताधारकांना न्याय मिळणे अपेक्षित असून शासनाच्या नियमाप्रमाणे आवश्यक तो नजराणा भरण्यास मालमत्ताधारक तयार आहेत. ज्यामुळे शासनाला फार मोठ्या प्रमाणावर महसूल मिळण्यास मदत होईल. वर्षानुवर्षे या ठिकाणी वास्तव्य असल्याने व त्याच्या नावाने ग्रामपंचायत नमुना क्रमांक ८ अ असल्याने त्यांना, त्यांना त्या मालमत्ता नियमित करून देणे, हेच उचित योग्य ठरेल यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष पंकज शामकांत महाजन यांनी जळगाव तहसीलदार नामदेव पाटील यांना भेट घेऊन निवेदन दिले आहे.

Protected Content