कर्नाटकात गुरुवारी बहुमताची परीक्षा ; मुख्यमंत्री कुमारस्वामींपुढे संकट

640 6401562570999vwc8 Karnataka

 

बेंगळुरू (वृत्तसंस्था) कर्नाटक विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना येत्या गुरुवारी म्हणजे १८ जुलै रोजी बहुमत सिद्ध करण्याची संधी दिली आहे. येत्या गुरुवारी कर्नाटक विधानसभेत कुमारस्वामी सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यात येणार असून यावेळी कुमारस्वामी विश्वासदर्शक ठराव जिंकतात का? याचीच उस्तुकता सगळ्यांना लागून आहे.

काँग्रेस आणि जेडीएसला आशा आहे की, बंडखोर आमदार त्यांना साथ देतील व सरकार वाचवण्यास मदत करतील. तर, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते सिद्धरमय्या यांनी देखील म्हटले आहे की, चर्चेनंतर विश्वासदर्शक ठरावावर १८ जुलै रोजी मतदान होणार आहे. या अगोदर भाजपाने कर्नाटक विधानसभा अध्यक्षांकडे विश्वासदर्शक ठरावासाठी तारीख निश्चित करण्याची मागणी केली होती. तर कर्नाटक भाजपा अध्यक्ष येदियुरप्पा यांनी म्हटले आहे की, त्यांना बहुमत प्राप्त करण्याची पुर्णपणे खात्री आहे. मुंबईत असलेले १५ आमदार व दोन अपक्ष आमदार भाजपाला पाठींबा देणार आहेत. शिवाय भाजपाला आणखी दोन आमदारांचा पाठींबा मिळाला आहे. भाजपा नेते जगदीश शेट्टार यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचा शक्तीप्रदर्शनादरम्यान पराभव होणार आहे. भाजपाचे १०५ आमदार एकत्र आहेत. त्यामुळे गेल्या दहा दिवसांपासून कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या राजकीय ड्राम्यावर पडदा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Protected Content