नगर छावणी क्षेत्रातील सर्वच विक्रेत्यांची कोरोना चाचणी

नगर वृत्तसंस्था । कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे नगर जवळील भिंगार येथे असणाऱ्या छावणी परिषदेने त्या क्षेत्रातील सर्व भाजीविक्रेते, फळविक्रेते, खाद्यपदार्थ विक्रेते यांच्यासह इतर सर्व व्यावसायिक व दुकानदार यांना, त्यांच्यासह दुकानातील कर्मचाऱ्यांची चाचणी करून घेणे सक्तीचे केले आहे.

जे व्यावसायिक व दुकानदार चाचणी करणार नाहीत, त्यांना दुकान उघडण्यास परवानगी दिली जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. नगर शहराच्या लगतच भिंगार असून येथे छावणी परिषद आहे. आतापर्यंत जवळपास तीनशेवर रुग्ण या भागात आढळले आहे. त्यामुळे वाढणारा प्रादुर्भाव वेळीच रोखण्यासाठी येथील छावणी परिषदेने आता खबरदारीचा उपाय म्हणून व्यावसायिक व दुकानदार व दुकानांमधील कर्मचारी यांना टेस्ट करणे सक्तीचे केले आहे. तसे पत्रच छावणी परिषदेने काढले आहे. चाचणी डॉ.बी.आर.आंबेडकर कँटोंन्मेंट हॉस्पिटल याठिकाणी जाऊन करून घ्यावी. चाचणी केलेले प्रमाणपत्र हे दुकानात ठेवावे. जे व्यावसायिक व दुकानदार चाचणी करणार नाहीत, त्यांना दुकान चालू ठेवण्याची परवानगी मिळणार नाही. तसेच प्रमाणपत्राशिवाय दुकान, व्यवसाय चालू असल्याचे आढळून आल्यास दुकान सील करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही छावणी परिषदेने स्पष्ट केले आहे.

Protected Content