Home राजकीय आधी नाथ होते आता ‘दास’ झाले : उध्दव ठाकरेंचा हल्लाबोल

आधी नाथ होते आता ‘दास’ झाले : उध्दव ठाकरेंचा हल्लाबोल

0
110
THAKRE

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत उध्दव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत आधी नाथ होते, आता दास होते अशा शब्दात टीका केली आहे. तर बंडखोरांनी स्वत: काय करावे हे ठरवावे असे देखील त्यांनी सांगितले.

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आज पक्षप्रमुख मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत करण्यात आली आहे. यात शिंदे गटासह आनंदराव अडसूळ, रामदास कदम आणि अनंत गिते या ज्येष्ठ नेत्यांचा अपवाद वगळता पक्षाचे आमदार आणि खासदार यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी बंडखोर आमदार आणि विशेष करून एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. ते म्हणाले की, आम्ही त्यांना काहीही कमी केले नव्हते. मात्र त्यांनी गद्दारी केली. आता याची फळे त्यांना भोगावीच लागतील. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर फक्त शिवसेनेचाच अधिकार आहे. इतरांनी त्यांचे नाव वापरता कामा नये. मते मागायचीच असतील तर आपल्या बापाच्या नावावर मागा असे ठणकावले. बंडखोरांच्या बुडाशी बॉंब लागला असल्याचेही त्यांनी सांगितले.

 


Protected Content

Play sound