Home Cities जळगाव सप्टेंबर महिन्याचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द

सप्टेंबर महिन्याचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द

0
102

जळगाव प्रतिनिधी । जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेला महिन्याच्या सोमवारी लोकशाही दिन कोरोनामुळे रद्द करण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविण्यात आले आहे.

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. तथापि, सद्यस्थितीत संपूर्ण जगात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेला आहे. सदरहू विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत संपूर्ण देशभरात 30 सप्टेबर, 2020 पर्यंत लॉकडाऊन घोषित केलेला आहे.

त्यानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून माहे सप्टेंबर मधील पहिल्या सोमवारी होणारा 7 सप्टेंबर, 2020 रोजीचा नियोजित जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.


Protected Content

Play sound