थोरगव्हाणच्या उपसरपंच पाटील यांच्याविरुध्द प्रस्ताव दाखल

patil

 

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील थोरगव्हाण ग्राम पंचायतीच्या उपसरपंच ज्योती पाटील यांच्या विरूध्द ८ ग्राम पंचायत सदस्यांनी तहसीलदार जितेन्द्र कुंवर यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे.

या संदर्भातील वृत असे की, तालुक्यातील थोरगव्हाण ग्राम पंचायतीच्या विद्यमान उपसरपंच ज्योती पाटील या ग्राम पंचायतीच्या कारभारात मनमानी अविचारी शब्दांचा वापर करतात, तसेच त्यांच्या कुटुंबातील मंडळी काही एक कारण नसतांना किरकोळ कामकाज सोडुन काही लोकांना शिवीगाळ करतात. याचबरोबर एकुण ९ सदस्य असलेल्या या ग्राम पंचायत मध्ये सरपंच गटाचे ४ सदस्य व विरोधी गटाचे 5 सदस्य असुन, विरोधी व सत्ताधारी गटांच्या सदस्यांनी एकत्र येवुन लोकनियुक्त सरपंच उमेश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली 5 वर्षात 5 उपसरपंच होतील असे ठरले असतांना देखील विद्यमान उपसरपंच ज्योती पाटील यांच्या उपसरपंच पदाचे कार्यकाळ हे फेब्रुवारीमध्ये पुर्ण झाल्याने त्यांनी आता आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. तसेच 5 महीने अधिक वेळ झाल्याने अखेर ९ पैक्की ८ सदस्यांनी तहसीलदार जितेन्द्र कुंवर यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव सादर केला आहे. त्यांच्या अशा वागणुकीच्या त्रासाला कंटाळुन ग्राम पंचायत सदस्य हिरालाल चौधरी, पदमा पाटील, मनोहर पाटील, मथुरा पाटील, शिन्दु पाटील, गोपाळ पाटील, अशोक भालेराव, यशोदा भालेराव यांनी अविश्र्वास प्रस्ताव सादर करत त्यावर स्वाक्षरी केल्या आहेत. यावेळी दिपक बाविस्कर उपास्थित होते.

Protected Content