ब्रेकींग : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाचोर्‍यात दाखल : जल्लोषात स्वागत

पाचोरा- नंदकुमार शेलकर | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पाचोरा येथे दाखल झाले आहे. त्यांचे अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आले.

पाचोरा तालुक्यातील लोहारी येथे कालपासून बडगुजर समाजाचे महाअधिवेशन सुरू झाले आहे. याचा समारोप आज दुपारी होत असून यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आले आहेत. एम.एम. कॉलेजच्या प्रांगणात तयार करण्यात आलेल्या हेलीपॅडवर मुख्यमंत्र्यांचे हेलीकॉप्टर सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास उतरले. हेलीकॉप्टरमधून उतरून आल्यानंतर फटाक्यांची जोरदार आतषबाजी करून त्यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील, आ. किशोरआप्पा पाटील यांच्यासह नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, लोहारी येथील कार्यक्रमाला उपस्थिती दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या निवासस्थानी भोजनासाठी जाणार असून यानंतर ते रात्री जळगाव विमानतळावरून मुंबई येथे जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content

%d bloggers like this: