पाचोरा येथे तरूणाचा तोल गेल्याने हिवरा नदीत बेपत्ता; शोधकार्य सुरू

पाचोरा प्रतिनिधी । शहरातील कृष्णापुरी भागात हिवरा नदीच्या पुलवरून जात असलेल्या मुलाचा तोल गेल्याने पाण्यात वाहून गेल्याची घटना आज घडली. या महिन्यातील या पुलावरून वाहून गेल्याची ही दुसरी घटना आहे. वाहून गेलेल्या मुलाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

पाचोरा येथील हिवरामाई नदीत कृष्णापुरी भागात जोडणारा नदीचा पुल ऐन पावसाळ्यात तोडल्याने पुलाचे काम झाले नाही, मात्र बळी जात आहे. आज पुन्हा एक बळी गेला असल्याने चिंता वाढली आहे. शासनाच्या परीपत्रकानुसार ऐन पावसाळ्यात रस्ते किंवा पुलाची कामे करु नये असे असतांना पाचोरा नगर परिषदच्या ‘हम सो कायदा’ प्रमाणे शहरातील सर्व मुख्य रस्ते फोडुन ठेवले तर पाचोरा आणि कृष्णापुरी भागाला जोडण्यात येणारा महत्त्वाचा पुल कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता पुलाचे काम सुरू ठेवले.  यामुळे नागरिकांना नाहक  मनस्ताप सहन करावा लागत आहे. जनतेचा उद्रेकाची वाट न. पा. प्रशासन बघत आहे असेच वाटत आहे.

आज २८ सप्टेंबर २०२१ रोजी पुन्हा पाचोरा येथील कृष्णापुरी भागातील रहिवासी उत्तम पांचाळ यांचा मुलगा साहेबराव पांचाळ याचा नदीकाठी तोल सुटल्याने पाण्यात वाहून गेला. उत्तम पोहन्याची शैली असताना देखील तो स्वताला बाहेर निघण्यास अपयशी ठरला. अद्याप सापडलेला नाही. यापुर्वी आठ दिवसांपासून शिंपी नामक युवक अद्याप बेपत्ता आहे. दोन लोकांचा जीव जाणे याला कोण जबाबदार आहे. याची नगर परिषद ने जबाबदारी घेवुन तात्काळ त्या परीवाराला नगर परिषद ने आर्थिक मदत करावी अशी मागणी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केली आहे.

 

Protected Content