पाटचारीत बुडून मुलाचा मृत्यू

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील साकळी येथील मुलाचा पाटचारीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे.

या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की , निखिल मुकुंदा सोनवणे ( वय१४ वर्ष राहणार आंबेडकर नगर साकळी ) हा इयत्ता १० शिकणारा मुलगा साकळी शिवारातील पाटचारी जवळ आज दिनांक २२ फेब्रुवारी बुधवार रोजी सकाळी ८ वाजता आपल्या बकर्‍या चारण्यासाठी गेला होता. यावेळी गावातीलच राहणारा रणविर भिला सोनवणे हा देखील त्याच्या सोबत बकर्‍या चारण्यासाठी गेला होता. यावेळी निखिल सोनवणे हा पाटचारीच्या हातपाय धुण्यासाठी गेला असता त्याचा पाय सरकुन तोल जावुन पाण्यात बुडाला.

यावेळी त्याच्या सोबत असलेल्या रणविर सोनवणे याने तात्काळ गावाकडे धाव घेत घटने ची सविस्तर माहीती कळविल्याने यावेळी गावातील काही तरूणांनी पाटचारी कडील घटनास्थळी धाव घेत निखिल सोनवणे यास पाटचारीतुन बाहेर काढले. त्याला बाहेर काढुन तात्काळ यावलच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यास डॉक्टरांनी मृत्यु घोषीत केले . या संदर्भात यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असुन, यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ सचिन देशमुख यांनी निखिल सोनवणे याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले. या दुर्घटनेमुळे साकळी परिसरावर शोककळा पसरली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content