आ. चंद्रकांत पाटलांचा पाठपुरावा : पाच कोटींच्या निधीला मंजुरी

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याने मतदारसंघातील गावांमधल्या मागासवर्गीय वस्त्यांमध्ये विविध विकास कामांसाठी पाच कोटी रूपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे.

भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत सन २०२२-२३ या वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर मतदारसंघातील बोदवड, रावेर व मुक्ताईनगर तालुक्यातील ग्रामीण भागातील मागासवर्गीय वस्त्यांमध्ये विविध विकास कामांसाठी ५ कोटी रु. निधी सह मंजुरी मिळाली आहे. यासंदर्भात सामाजिक न्याय विकास विभाग , शासन निर्णय क्रमांक : सावियो २०२३ प्र.क्र./अजाक मुंबई दि.८ फेब्रुवारी २०२३ अन्वये परिपत्रक प्रसिद्ध झालेले आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याने या निधीला मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.

या निधीतून मागासवर्गीय वस्तीमध्ये पेव्हर ब्लॉक बसविणे बुद्ध विहार, सुशोभीकरण , सामाजिक सभागृह , स्मशानभूमी बांधकाम , कॉंक्रीटीकरण, डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर सुशोभीकरण , रस्ता व गटार बांधकाम अशी कामे मंजूर झालेली आहे.

या निधीचा विनीयोग पिंप्री पंचम, कर्की, नायगाव, हरताळे, सालबर्डी, कोथळी, वढोदा, हलखेडा, सुळे, काकोडा, उचंदा, मेळसांगवे, चिंचोल, अंतूर्ली, तरोडा, कुंड, बोदवड, वाकी, बोरगांव, धुळे, घोडसगाव, चिचखेडा बू, खामखेडा, चांगदेव, धामणगाव, पातोंडी, मानेगाव, भोटा, पारंबी, कुर्‍हा, काकोडा, साळशिंगी, नाडगाव, कुर्‍हा हरदो, मनुर बू, मानमोडी, शेलवड, विचवा, घानखेड, हिंगणे, जलचक्र, लोणवाडी, येवती, एणगाव, मस्कावद सिम, मस्कावद बू, , मस्कावद खू. , ऐनपुर, तांदलवाडी , कांडवेल, पुरी , गाते, राजुरा या गावांमध्ये करण्यात येणार आहे.

Protected Content