वीस हजाराची लाच घेणाऱ्या लिपीकाला रंगेहात पकडले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतजमीन गटाच्या पोट हिस्सा मोजणीसाठी चाळीस हजार रूपयांच्या लाचेच्या मागणीतील उर्वरित वीस हजाराची रक्कम स्विकारणाऱ्या शिंदखेडा येथील भूमीलेख कार्यालयातील छाननी लिपीकास जळगावच्या लाचलुपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुशांत अहिरे उप अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय शिंदखेडा येथे कार्यरत आहे तर तक्रारदार हा जळगाव संभाजीनगर परिसरातील रहिवासी आहे.

अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे जळगाव शहरातील रहिवाशी आहेत. त्यांनी बेटावद गावातील शेतजमीन गटाच्या पोट हिस्सा मोजणीसाठी अती तातडीचे चलन भरुन अर्ज सादर केला होता. या कामासाठी छाननी लिपीक सुशांत अहिरे याने तक्रारदाराकडून ११ नोव्हेंबर २०२२ रोजी चाळीस हजार रुपयांची लाच मागीतली होती. त्याच दिवशी २० हजार रुपयांची आगावू रक्कम स्विकारली होती. उर्वरीत २० हजाराची रक्कम स्विकारतांना त्यास आज रंगेहाथ पकडले.

एसीबीचे पोलिस उप अधीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक एन.एन. जाधव तसेच पो.नि.संजोग बच्छाव, सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, हे.कॉ.अशोक अहिरे, पो.ना. ईश्वर धनगर, बाळू मराठे, पो.ना. महाजन, पोकॉ.अमोल सूर्यवंशी, पो.कॉ. प्रणेश ठाकूर यांनी परिश्रम घेतले.

Protected Content