मविप्र वाद : संजय भास्कर पाटील यांना अटक !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या ताब्यावरुन सुरु असलेला वाद प्रकरणात दोघा गटाच्या समर्थकांमध्ये तुफान हाणामारी व दगडफेक झाली होती. या गुन्ह्यातील संजय भास्कर पाटील यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुपारी दिक्षीतवाडी येथील राहत्या घरातून अटक केली आहे.

अधिक माहिती अशी की, जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेवरील ताब्यावरून पाटील व भोईटे गटात-तीन चार वर्षांपासून वाद सुरु आहे. जुन-२०१८ मध्ये संस्थेच्या ताब्यावरुन पोलिसांनी दोघा गटांना संस्थेच्या कार्यालयात जाण्यास मज्जाव केला होता. तेव्हापासून हे प्रकरण चांगलेच चिघळले होते. दरम्यान, तत्कालिन तहसीलदार निकम यांनी दिलेल्या आदेशावरून पाटील गटाने संस्थेतील कार्यालयातील ताबा घेत कामकाज सुरू होते होते. यावरून भोईटे गटाने १९ जुन २०१८ रोजी भोईट गटाने आक्षेप घेत नुतन मराठा महाविद्यालयासमोर दोन्ही गटांचे समर्थक समोरासमोर भिडले होते. यात हाणामारी आणि दगडफेक करण्यात आली होती. या प्रकरणी सुनिल धोंडू भोईट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात ९७/२०१८ प्रमाणे भादंवि कलम ३०७, ३०४, १४३, १४७, १४९ प्रमाणे एकुण १७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या १७ आरोपींपैकी १२ जणांना अटक करण्यात आली होती. तर उर्वरित पाच संशयितांपैकी बापू चव्हाण आणि चंद्रकांत पाटील घटनेच्या वेळी नसल्याचे निष्पन्न व तफावत असल्याने त्यांना अटक केलेली नव्हती. तर पियुष नरेंद्र पाटील आणि भूषण पाटील हे त्यादिवशी बाहेरगावी असल्याने त्यांची नावे वगळण्यात आले. या गुन्ह्यातील शेवटचा संशयित आरोपी संजय भास्कर पाटील याला संशयित म्हणून आज दुपारी १२ वाजता स्थानिक गुन्हे शाखा आणि जिल्हा पेठ पोलीसांनी अटक केली आहे. पुढील कारवाई सुरू आहे.

Protected Content