सातगाव ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचे काम रखडले; ग्रामस्थांची नाराजी (व्हिडीओ)

पाचोरा प्रतिनिधी ।  तालुक्यातील सातगाव येथील ग्रामपंचायतची नवीन इमारतीचे बांधकाम गेल्या सहावर्षांपुर्वी सुरू केले होते. आज मात्र हे बांधकाम रखडल्याने ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. 

जुनी इमारत गेल्या सहा वर्षापासून पाडण्यात आली असून, नवीन इमारतीचे काम अर्धवट झाल्याने, ग्रामपंचायतीचे दप्तर भाड्याच्या गाळ्यात स्थलांतरित केले आहे. आताच निवडून आलेले १३ ग्रामपंचायत सदस्यांची मिटिंग कोठे घेण्यात यावी असा प्रश्न नवनिर्वाचित सदस्य आणि ज्ञानेश्वर चौधरी यांनी विचारला आहे. 

सातगाव (डोंगरी) ता. पाचोरा गृपग्रामपंचायतमध्ये सातगावसह गहुले, तांडा या गावांचा समावेश असून, ७ हजाराच्या दरम्यान लोकसंख्या आहे. मात्र ग्रामपंचायतीलाच दप्तर ठेवण्यासाठी जागा नसल्याने ग्रामपंचायतीची मीटिंग व इतर कामे कशी होणार. असा प्रश्न शिवसेनेचे ज्ञानेश्वर चौधरी त्यांनी विचारला आहे. ग्रामपंचायतीचे काम जेव्हा सुरू करण्यात आले. त्यावेळेला आर्थिक नियोजन करूनच बांधकामाला सुरुवात केली होती. तसेच ग्रामपंचायत इमारतीच्या तळमजल्याला दुकानांसाठी गाळे तयार करण्यात आले आहे. गाळेधारकाकडून बर्‍यापैकी पैसेही घेण्यात आले आहे. मात्र आजपर्यंत इमारतीचे पन्नास टक्केच्या दरम्यान काम झाले आहे. मात्र काम का रखडले ? हे समजत नाही. म्हणून नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी यात लक्ष घालून इमारत कशी उभी राहील आणि  इमारतीत कामकाज कसे लवकर सुरू होईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

सातगाव ग्रामपंचायत इमारतीचे काम का रखडले. याची चौकशी करण्यात येईल आणि ज्यांच्या अधिकारात काम असेल त्यांनी काम केले नसेल तर त्यांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल येईल.

– अतुल पाटील, गट विकास अधिकारी, पंचायत समिती, पाचोरा

 

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/328466401783177

 

Protected Content