गो.से. हायस्कूल येथे आंतरराष्ट्रीय योगा दिवस उत्साहात

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो.से. हायस्कूल, येथे आज आंतरराष्ट्रीय योगा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. योगाचार्य म्हणून प्राध्यापक डॉ. अतुल सूर्यवंशी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांनी योगासने केली. योगाचे महत्व, दैनंदिन जीवनामध्ये योगा विषयी चांगल्या सवयी, भौतिक ज्ञान गरजेचे आहे. दररोज योगा करून जीवन आनंददायी सुखकर बनवा असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. योगाची विविध आसने विद्यार्थ्यांसमोर करून दाखवली व विद्यार्थ्यांकडून करून घेतली.

यावेळी पंचायत समिती विस्तार अधिकारी समाधान पाटील, मुख्याध्यापक सुधीर पाटील, उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ, पर्यवेक्षक आर. एल. पाटील, एन. आर. पाटील स शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यानंतर कलादालन येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी विद्यार्थ्यांना योगाची विविध चित्रे काढली. योगा दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला. चित्रकला स्पर्धेसाठी कलाशिक्षक सुबोध कांतायन, प्रमोद पाटील, ज्योती पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचलन आर. बी. बोरसे यांनी केले.

Protected Content