ओबीसी जनगणनेची आमदार पाडळकरांचीही मागणी

 

नागपूर : वृत्तसंस्था । “ओबीसी समाजाची जातीनुसार जनगणना व्हावी,” अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. ओबीसी समाजाच्या जातीनुसार जणगणनेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यानंतर ओबीसी समाजाच्या जातीनुसार जनगणना व्हावी यासाठी गोपीचंद पडळकरांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. “ओबीसी समाजाची जातीनुसार जनगणना व्हावी, यासाठी उद्या पंतप्रधान मोदींना पत्र देऊ,” असे गोपीचंद पडळकर म्हणाले. “ओबीसींच्या जातीनुसार जणगणनेसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करु,” अशीही माहिती पडळकरांनी दिली.

ओबीसी समाजाची स्वतंत्रपणे जनगणना व्हावी, या मागणीसाठी जालन्यात महामोर्चा काढण्यात आला होता. या महामोर्चात अनेक प्रमुख ओबीसी नेते सहभागी झाले होते.

आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील ओबीसी समाज आक्रमक झाला असतानाच पंकजा मुंडे यांनी मैदानात एन्ट्री घेतली आहे. त्यांनी एक ट्विट करून ओबीसी समाजाला त्यांचा हक्क देण्याची मागणी केली होती.

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी लोकसभेत केलेल्या भाषणाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीसोबत पंकजा मुंडे यांनी ‘आम्हीही याच देशातील आहोत, आमचीही जनगणना करा… ओबीसींची जनगणना आवश्यक आणि अनिवार्य आहे’, अशी कॅप्शन दिली होती. त्यामुळे आगामी काळात ओबीसी समाजाच्या मागण्यांच्या मुद्द्यावरुन आक्रमक होण्याचे संकेत पंकजा मुंडे यांनी दिले होते.

Protected Content