ओझरखेडा धरणाच्या पाण्याची रोहिणी खडसे यांनी केले जलपूजन

जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त ओझरखेडा धरणात हतनूर धरणातून ऑनलाइन पद्धतीने जलसंपदा मंत्री जयवंतराव पाटील यांनी बटन दाबून पाणी सोडले तर जिल्हा मध्यवर्ती बॅकेचा अध्यक्षा रोहिनी खडसे यांनी जलपूजन केले.

हातनुर धरणातून सोडण्यात आलेले पाणी ओझरखेडा धरणामध्ये पोचल्याने ओझरखेडा धरणाच्या ठिकाणी जाऊन जिल्हा मध्यवर्ती बॅक अध्यक्षा रोहिनी खडसे यांनी पाण्याची विधिवत पूजा केली. यावेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर व राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

 

Protected Content