विरावली वस्तीच्या विकास कामांसाठी चार लाखाचा निधी मंजूर

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील विरावली गावातील दलीत वस्तीच्या विकास कामांसाठी जिल्हा परिषदच्या माध्यमातुन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा चोपडा आमदार लताताई सोनवणे यांच्या पाठपुरावा व सहकार्याने चार लाखाचा निधी मंजुर झाला आहे. 

यावल तालुक्यातील विरावली गावातील दलीत वस्तीकरिता जिल्हा परिषदच्या माध्यमातुन गावातील वार्ड क्रमांक१मध्ये अनुसुचित जाती नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास योजनेअंतर्गत दिनांक २७ ऑगस्टच्या प्रशासकीय मान्यता आदेशानुसार २०२१ते२०२२या आर्थिक वर्षात यावल पंचायत गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील यांच्या शिफारसीनुसार प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार विरावली गावातील वार्ड क्रमांक१मधील पोच रस्त्याकरिता ३ लाख रुपयांचा व बौद्ध समाज मंदीरच्या दुरूस्तीसाठी एक लाख रुपयांचा निधी असे एकुण चार लाख रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. 

दरम्यान या करीता जळगावचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील, चोपडा विधानसभा क्षेत्राच्या आमदार लताताई सोनवणे, माजी आमदार तथा रावेर लोकसभा सह संपर्क प्रमुख चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या पाठपुराव्याने व सहकार्याने दलीत वस्तीच्या विकासासाठी चार लाख रुपयांचा निधी मंजुर करण्यात आल्याचे पत्र जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पंकज आशिया यांनी काढले आहेत. दरम्यान या कामासाठी विरावलीचे माजी सरपंच, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तुषार उर्फ मुन्ना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावाच्या सरपंच सौ कालिमा फिरोज तडवी, उपसरपंच मनिषा ईश्वर पाटील, ईश्वर धोडुसिंग पाटील, ग्राम पंचायत सदस्य नथ्थु नामदेव अडकमोल, हमीद दलशेर तडवी आणि ग्रामसेवक आर.टी. बाविष्कर यांनी या विकास कामांसाठी पाठपुरावा केला .

Protected Content