केसीईच्या प. वि. पाटील विद्यालयात बालदिन उत्साहात साजरा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील केसीई सोसायटीच्या प.वि.पाटील विद्यालयात स्व. पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्ताने बालदिन साजरा करण्यात आला. यावेळी रविवारी १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता मान्यवरांच्याहस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याहस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.

 

केसीई सोसायटीच्या प.वि.पाटील विद्यालयात रविवारी १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता भारताचे पहिले पंतप्रधान तथा चाचा पंडीत जवाहरलाल नेहरून यांची जयंती बालदिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ शिक्षिका सरला पाटील यांच्याहस्ते पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कालिया मर्दन, भक्त प्रल्हाद, बाळ श्रावण, बाळ आजीबाईच्या गोष्टी, कृष्ण सुदामा आदी पौराणिक बालकथा ऑनलाइन सेशनच्या माध्यमातून सांगितल्या.

उपशिक्षक योगेश भालेराव यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्याची माहिती दिली तर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. प्रसंगी मुख्याध्यापिका रेखा पाटील, उपशिक्षक अशोक चौधरी, कल्पना तायडे, धनश्री फालक सूर्यकांत पाटील, दिपाली चौधरी, स्वाती पाटील, सुनील नारखेडे, सुधीर वाणी आदी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content