Home आरोग्य उद्या बहिणाबाई कोविड केअर सेंटरला तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक देणार भेट

उद्या बहिणाबाई कोविड केअर सेंटरला तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक देणार भेट

0
41


 

जळगाव, प्रतिनिधी । लेवा पाटीदार सोशल फाऊंडेशन आणि लोकसंघर्ष मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमानाने तयार झालेल्या बहिणाबाई कोविड केअर सेंटरमध्ये उद्या रविवार दि. २० सप्टेंबर रोजी विविध विभागातील तज्ज्ञ डॉक्टर भेट देऊन तपासणी करणार आहेत.

लेवा पाटीदार स्पोर्टस् आणि सोशल क्लब फाउंडेशन व लोक संघर्ष मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय तंत्रनिकेतन येथे बहिणाबाई कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले आहे. या सेंटरला विविध सामाजिक संस्था, व्यक्तीतर्फे सहकार्य मिळत आहे. यानुसार रविवार २० सप्टेंबर रोजी युरोसर्जन डॉ.अनिल पाटील, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. विलास भोळे, डॉ. चेतन चौधरी, ऑर्थोपेडिशियन डॉ. जितेंद्र कोल्हे हे रुग्णांची तपासणी करणार आहेत. सकाळी ११ वाजता तपासणी करण्यात येणार असल्याची  माहिती प्रतिभा शिंदे, चंदन कोल्हे यांनी कळविली आहे.


Protected Content

Play sound