एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच : प्रवाशांना पर्यायी व्यवस्था देण्याकडे काना डोळा

यावल, प्रतिनिधी | येथील एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या आपल्या विविध प्रलंबीत मागण्यांसाठी मागील पाच दिवसापासुन बेमुदत संप पुकारला आहे. या संपात सहभागी असलेल्या आगारातील ८ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे वृत्त हाती आले आहे. तर यावल आगारातून प्रवाशांसाठी पर्यायी वाहतूक उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.

 

या संदर्भातील वृत्त असे की , शनिवार दि. ६ नोव्हेंबर पासून राज्यातील एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबीत मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे. या राज्यव्यापी बेमुदत संपात राज्यातील विविध एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी सहभाग घेतला आहे. ऐन दिवाळीच्या सणासुदीच्या दिवसात अचानक पुकारण्यात आलेल्या संपामुळे एकीकडे महामंडळाचा लाखो रुपयांचा महसुल तर बुडत आहे पण या संपामुळे प्रवासांचे अतोनात हाल होतांना दिसून येत आहे. प्रवासांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी उप प्रादेशीक परिवहन विभागाने काढलेल्या पर्यायी व्यवस्था लावण्यासाठीच्या खाजगी स्कुल बसेस आदी वाहतुकदारांचा पर्याय म्हणुन पाचारणा करावी असा आशयाच्या पत्राला मात्र यावल एसटी संपर्क प्रमुखांकड्डन आगारातुन कुठलीही पर्यायी व्यवस्था झाली नसल्याचे दिसत आहे. या बेमुदत संपात यावलच्या एसटी आगारातील तिनशेच्या वर कर्मचारी सहभागी झाले आहे त. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागणीत एस. टी. कर्मचाऱ्यांना इतर राज्याप्रमाणे शासनाने शासनात विलीनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी हा संप आहे. ही मागणी शासनाने मान्य केल्यास क्षणात हा राज्यव्यापी संप संपुष्ठात येईल असा विश्वास यावेळी उपस्थित संपकरी कर्मचाऱ्यांकडुन व्यक्त करण्यात येत आहे.

Protected Content