शेंदुर्णी येथील रथोत्सव व पालखी सोहळ्याला परवानगी

शेंदुर्णी ता. जामनेर (प्रतिनिधी) । शेंदुर्णी येथील वर्ष परंपरेनुसार रथोत्सव आणि पालखी सोहळा साजरा करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी परवानगी दिली आहे. तसे प्रसिध्दीपत्रक देखील जाहीर केले आहे.

गेल्या दोन वर्षापासून कोरोना मुळे शेंदुर्णी येथे  रथोत्सव आणि पालखी सोहळा साध्या पध्दतीने साजरा करण्यात आलेली होती. दरम्यान जिल्ह्यात कोरोना रूग्ण संख्या कमी असल्याने  बुधवारी १७ नोव्हेंबर रोजी होणारा रथोत्सव आणि पालखी सोहळा नियम व अटी नुसार साजरा करण्याचे सुचना संबंधित विभागाला देण्यात आले आहे. हा रथोत्सव मर्यादीत व प्रातिनिधी स्वरूपात साजरा करावा असे देखील जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. यावेळी पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात यावा अश्या सुचना देखील पोलीस प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

Protected Content