जळगाव प्रतिनिधी । अखिल भारतीय बारी-बरई-तांबोळी-चौरसीया-कुमारवत समाजाचे शतकीय महाअधिवेशन ३ फेब्रुवारी रोजी शिरसोली रोडवरील संत रुपलाल महाराज नगरात होत असून याची जय्यत तयारी करण्यात आल्याची माहिती माजी मंत्री रामदास बोडखे यांनी दिली.
पद्मालय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत रामदास बोडखे यांनी महाअधिवेशनाबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, या महाअधिवेशनाला २४ राज्यातील ३० हजार समाजबांधवांची उपस्थिती लाभणार आहे. हे महाअधिवेशन शिरसोली रोडवरील रतनलाल सी. बाफना यांच्या शेतात होत असून या शेताला संत रुपलाल महाराजनगर असे नाव देण्यात आले आहे. या महाअधिवेशनाला देशभरातून समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे बोडखे म्हणाले. या पत्रकार परिषदेला लातूरचे माजी नगराध्यक्ष संजय बोडखे, कार्याध्यक्ष मनोज बारी, सचिव रतन बारी, समिती प्रमुख अतुल बारी, पुंडलिक बारी, महिला अध्यक्षा मंगला बारी, गोपाल बारी, संतोष अस्वार, पुना बारी, योगेश नाठे आदी मान्यवर उपस्थित होते.